फटाकेयुक्त अननस खाल्ल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी समोर आल्यानंतर, सर्वच स्तरातून संताप व्यक्त व्हायला लागला. अखेरीस केरळ सरकारने पावलं उचलत पोलीस आणि वन-विभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखलं. सरकारी यंत्रणांच्या या प्रयत्नांना अखेरीस यश येताना दिसत आहे. केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.

दरम्यान या आरोपीचं नाव व इतर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही हत्तीणीच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणांना मिळालेलं हे पहिलं यश मानलं जात आहे. २७ मे रोजी या हत्तीणीने वेलियार नदीत आपला अखेरचा श्वास घेतला. वन-अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली होती. यानंतर केरळ सरकारने घटनेची दखल घेत, मारेकऱ्यांना अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं.

अवश्य वाचा – BLOG : तुम्ही हत्तीचा नाही, माणुसकीचा खून केलात !