इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजी (आयसीएमआर-एनआयई) च्या नव्या विश्लेषणानुसार कोविड १९ लसीचा एक डोस मृत्यूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे असल्याचे समोर आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ही शक्यता ८२ टक्के तर दुसऱ्या डोस नंतर ९५ टक्के असल्याचे या विश्लेषणात म्हटले आहे.

तामिळनाडूमधील अति जोखमीच्या गटांमधील मृत्यू रोखण्यासाठी कोविड -१९ लसीच्या प्रभावाचा हा अभ्यास २१ जून रोजी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आला. तामिळनाडू पोलीस विभागाने कर्मचार्‍यांच्या लसीकरणाची माहिती त्यामध्ये देण्यात आली. यामध्ये एकही डोस न घेतलेले,पहिला डोस आणि दुसरा डोस घेतलेल्यांच्या माहितीची विभागणी केली होती. तसेच करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लस घेतलेल्या नागरिकांची तसेच मृत्यू झालेल्या आणि रुग्णालयात असणाऱ्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

देशात संपूर्ण लसीकरणासाठी २०७ दिवस!

लस घेतलेल्या आणि लसीकरण न झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांमधील कोविड -१९ने मृत्यूच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी या आकडेवारीचा उपयोग केला गेला असे आयसीएमआर-एनआयईचे संचालक डॉ. मनोज मुर्हेकर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

तामिळनाडूमध्ये पोलीस खात्यात १ लाख १७ हजार ५२४ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. १ फेब्रुवारी ते १४ मे दरम्यान ३२,७९२ कर्मचाऱ्यांनी लसीचा एक डोस तर ६७,६७३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १७,०५९ कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही.

मुंबईतील लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची नाराजी; तातडीने धोरण आखण्याची राज्य सरकार आणि पालिकेला सूचना

१३ एप्रिल ते १४ मे दरम्यान या ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोविड-१९मुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या ३१ मृतांपैकी चार जणांनी लसीचे दोन डोस घेतले, सात जणांनी एक डोस आणि उर्वरित २० जणांनी लसीचा एक डोस घेतला नव्हता. लसीकरण केलेल्या आणि आणि लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूच्या घटनेची तुलनेत केली गेली, असे संशोधकांनी सांगितले. शून्य, एक आणि दोन डोस घेतलेल्या १००० कर्मचाऱ्यांमध्ये कोविड -१९ मुळे मृत्यूची टक्केवारी अनुक्रमे १.१७, ०.२१ आणि ०.६ होती.

दरम्यान,लसीकरणाबाबत विश्लेषणाचे परिणाम प्रकाशित अभ्यासाशी सुसंगत आहेत असे डॉ. मुर्हेकर म्हणाले.