एका मर्यादेबाहेर होणारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाला कारणीभूत आहे. वाहतुकीच्या साधनांमुळे कार्बन उत्सर्जनातून मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. बस आणि गाडयांच्या तुलनेत ट्रेनमुळे कमी प्रदूषण  होत असले तरी ट्रेनमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.

हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. या ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही. या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे. मोबाइल फोन आणि अन्य घरगुती उपकरणांमध्ये ज्या बॅटरी वापरल्या जातात त्याच बॅटरीचा वापर या ट्रेनमध्ये करण्यात आला आहे. अलस्टोममध्ये या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन १ हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

डिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंधनाची रचना आहे. ट्रेनची अतिरिक्त ऊर्जा लिथियम आयन बॅटरीमध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे. प्रवाशांसाठी जगातील या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा रविवारपासून जर्मनीमध्ये सुरु झाली आहे. नजीक भविष्यात आणखी अशा १४ ट्रेन चालवण्याची जर्मनीची योजना आहे. ब्रिटन, हॉलंड, डेन्मार्क, नॉर्वे, इटली आणि कॅनडा या देशांकडूनही हायड्रोजन ट्रेनची मागणी नोंदवण्यात आली आहे. डिझेल लोकोमोटीव्ह ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेनची किंमत जास्त आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास ही ट्रेन चालवण्यासाठी येणारा खर्च कमी आहे. या एका ट्रेनची किंमत ७० लाख डॉलर आहे. ताशी १४० किलोमीटर वेगाने पळण्यास या ट्रेन सक्षम आहेत.