News Flash

Covid-19 च्या चाचण्यासाठी भारताला अखेर चीनकडून घ्यावे लागले रॅपिड टेस्टिंग किट्स

रॅपिड टेस्टिंग किटमुळे Covid-19 च्या चाचण्या जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

चीनमधून आज करोना व्हायरसची चाचणी सामग्री येऊ शकते. यामध्ये रॅपिड टेस्टिंग किटचा समावेश आहे. या किट्समुळे Covid-19 च्या चाचण्या जलदगतीने करणे शक्य होणार आहे. चीनमधून सामनाची पहिली खेप येणार आहे. त्यामध्ये तीन लाख रॅपिड टेस्टिंग किट्स असणार आहेत.

चीनकडून या किट्सच्या निर्यातीला बराच विलंब झाला आहे. पुढच्या दोन आठवडयात चीनमधून असे आणखी २० ते ३० लाख किट्स भारतात पाठवण्यात येतील. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. खराब दर्जामुळे जगातील काही देशांमध्ये चिनी किट्सना नकार देण्यात आला. त्यानंतर चीन सरकारने निर्यातयोग्य आणि किट्सची दर्जात्मक चाचणी झालेल्या कंपन्यांची यादी तयार केली.

त्याशिवाय चीनच्या कस्टम विभागानेही किट्सच्या क्वालिटी टेस्टिंगचा आग्रह धरला. त्यामुळे भारतात हे किट्स पोहोचायला उशीर झाला. करोना संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या हॉटस्पॉसच्या भागात या रॅपिड टेस्टिंग किटसचा वापर करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 9:27 am

Web Title: first lot of covid 19 kits from china may arrive today dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चिंतेची बाब : भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या पुढे, मृत्यूचा आकडा ४१४ वर
2 “मोदीजी, राज्यांना नुसतं कौतुक नको करोनाविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक मदतही द्या”
3 दुर्दैवी! पोट भरण्यासाठी मजुरांवर स्मशानाबाहेर कचऱ्यात फेकलेली केळी खाण्याची वेळ
Just Now!
X