News Flash

करोनाचा परिणाम : संसदेच्या अधिवेशनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार ‘हे’ बदल

अडथळ्याशिवाय कामकाज होण्यासाठी करण्यात आले मोठे बदल

संग्रहित छायाचित्र

सध्या जगभरात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशातच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचीही तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभा सचिवालय संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यसभेचे सभापती वैकय्या नायडू यांनी सर्व तयारी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी संसदेच्या इतिहासातले काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

करोना विषाणूच्या संकटात संसदेचं कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावं यासाठी राज्यसभेच्या चेंबरमध्ये ४ मोठे स्क्रिन लावण्यात आले आहेत. तर राज्यसभेच्या गॅलरीमध्ये १ मोठा आणि ४ छोटे स्क्रिन लावण्याचं काम सुरू आहे. याव्यतिरिक्त गॅलरीमध्ये ऑडिओ कंसोल आणि अल्ट्राव्हॉयलेट जंतूनाशक रेडिएशनचा वापर केला जात आहे. संसदेच्या इतिहासात पहिल्यांना दोन्ही सदनं जोडली जात आहे. तसंच यासाठी ऑडिओ व्हिज्युअल सिग्नलच्या प्रसारणासाठी दोन्ही सदनांना जोडणारी विशेष केबलही लावण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त चेंबरला गॅलरीपासून वेगळं करण्यासाठी पॉली कार्बोनेट शीटचा वापर करण्यात येत आहे. १९५२ नंतर संसदेच्या इतिहासात असं पहिल्यांदा होत आहे जेव्हा संसदेच्या अधिवेशनासाठी दोन्ही सदनांच्या चेंबर आणि गॅलरींचा वापर करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता यावं यासाठी अशा प्रकारच्या विशेष योजना तयार करण्यात येत आहेत.

राज्यसभेचे सभापती वैकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निरनिराळ्या पर्यायांच्या पडताळणीनंतर पावसाळी अधिवेशनासाठी दोन्ही सदनांचे चेंबर आणि गॅलरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यसभेच्या ६० सदस्यांना राज्यसभेच्या चेंबर आणि ५१ सदस्यांना राज्यसभेच्या गॅलरीत बसवण्यात येणार आहे. तर बाकी १३२ सदस्य लोकसभेच्या चेंबर्समध्ये बसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 6:55 pm

Web Title: first time in the history of indian parliament made major changes to work in full flow coronavirus pandemic jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारताचे माजी क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचं निधन
2 बंगळूरू हिंसाचार: जमावानं काँग्रेस आमदाराचं घर जाळलं, ३ कोटींचा ऐवज लुटला!
3 …आणि २०१४ मध्ये हिंदुत्वासाठीच्या युद्धाची झाली सुरूवात; सुब्रमण्यम स्वामींचं विधान
Just Now!
X