महाकाय ‘टायटॅनिक’ जहाजाच्या दुर्घटनेला १०० वर्ष उलटून गेली आहेत. पण आजही या जहाजाबद्दलचे कुतूहल अजिबात कमी झालेले नाही. याच कुतूहलापोटी जवळजवळ १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच हे जहाज बुडाले त्या ठिकाणी वैज्ञानिकांनी पहाणी केली. ‘टायटॅनिक’चे अवशेष वेगाने नष्ट होत असून लवकरच हे अवशेष कायमचे नष्ट होतील अशी भिती वैज्ञानिकांनी या पहाणीनंतर व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ‘टायटॅनिक’चे खास आकर्षण असणारा डेक, कॅप्टनचा बाथ टब अशा अनेक लोकप्रिय भागांचे मोठे नुकसान झाल्याचे या पहाणीमध्ये दिसून आहे.

१९१२ साली टायटॅनिक जहाज जेव्हा आपल्या पहिल्या प्रवासाला निघाले तेव्हा हे जहाज कधीच बुडणार नाही अशी जाहीरात करण्यात आली होती. त्या काळातील ते सर्वात अत्याधुनिक, आलिशान जहाज होते. मात्र ग्रीनलॅण्डमधील ‘जॅकोबश वन’ नावाच्या याच हिमनगाला धडकल्याने टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. ज्या ठिकाणी ‘टायटॅनिक’ बुडाले त्या ठिकाणी समुद्रतळाची आणि ‘टायटॅनिक’च्या अवशेषांची पहाणी केली. यावेळेस बुडलेल्या जहाजाची मोठी पडझड झाल्याचे दिसून आले. कॅप्टनचा डेकही तुटल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

अटलांटिक महासागरामध्ये १३ हजार १२५ फूट (चार हजार मीटर) खोलीवर ‘टायटॅनिक’चे अवशेष आहेत. या अवशेषांवर पाण्याचा तसेच इतर अनेक गोष्टींचा परिणाम होत आहे. या ठिकाणच्या पाण्याचे तापमान वर्षातील बराच काळ एक डिग्री सेल्सियस असते. समुद्रातच्या पाण्यातील क्षारांचाही या जहाजाच्या अवशेषांवर परिणाम होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे धातूवर परिणाम करणाऱ्या जिवाणूंमुळे जहाच्या अवशेषांची झीज होत असल्याचे दिसून आले आहे. कॅलॅडॅन ओशनिक या कंपनीच्या माध्यमातून ही पहाणी करण्यात आली आहे.

‘टायटॅनिक’संदर्भातील जाणकार पार्क स्टेफीन्सन यांनी जहाजाच्या अवशेष नष्ट होत असल्याचे समजल्यानंतर धक्का बसल्याचे म्हटले आहे. ‘जहाजाचा संपूर्ण डेकच कोसळत आहे. आलिशान स्टेटरुमचीही मोठी पडझड झाली आहे. आणि भविष्यात या अवशेषांची अजून पडझड होणार आहे,’ असं मत स्टेफीन्सन यांनी व्यक्त केलं आहे. वैज्ञानिक लॉरी जॉन्सन यांनी हे अवशेष कायमचे नष्ट होतील अशी भिती व्यक्त केली आहे. ‘भविष्यातही या अवशेषांची झीज होत राहणार. ज्या विषाणूंमुळे ही झीज होत आहे ते नैसर्गिक आहे. मात्र अवशेषांची झीज होण्याचा वेग अधिक आहे. हे विषाणू लोखंड आणि सल्फर खात असल्याने या अवशेषांची झीज झपाट्याने होत आहे. असंच सुरु राहिल्यास हे सर्व अवशेष नष्ट होतील,’ असं मत जॉन्सन यांनी व्यक्त केलं आहे. आठ दिवसांच्या पहाणीदरम्यान बुडलेल्या ‘टायटॅनिक’च्या अवशेषांचे व्हिडिओ शुटींगही करण्यात आले आहे.

१९१२ साली हे जहाज बुडाले तेव्हा त्यामधील दीड हजार प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

 

१९९७ साली प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी या दुर्घटनेवर बनवलेला ‘टायटॅनिक’ सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. जगभरात या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन या जहाजाबद्दल सर्वसामान्यांना असणारे आकर्षण अधिक वाढले होते. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या जहाजावरील अनेक जागांचे अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.