पहिल्या अंध आयएएस अधिकारी प्रांजली पाटील यांचा जीवनमंत्र

तिरुवनंतपुरम : ‘जीवनात कधीच हार मानू नका, प्रयत्न सोडू नका’,  असा संदेश देशातील पहिल्या अंध आयएएस अधिकारी प्रांजली पाटील यांनी येथे उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे सोमवारी स्वीकारताना दिला. पाटील या मूळ उल्हासनगर येथील आहेत.

प्रांजली पाटील या केरळ केडरच्या तीस वर्षीय अधिकारी असून त्यांनी  अंधत्त्वावर मात करीत हे यश मिळवले आहे. त्या म्हणाल्या की, जीवनात कधीच हार मानू नये प्रयत्न करीत रहावे. त्यातूनच आपण हवे ते यश मिळवू शकतो.

प्रांजली पाटील यांनी सहा वर्षांच्या असताना दृष्टी गमावली होती. त्यानंतर निर्धाराने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन  २०१६ मध्ये यश मिळवले त्या परीक्षेत त्यांचा ७७३ वा  क्रमांक आला पण त्यावर त्या समाधानी नव्हत्या त्यामुळे त्यांनी पुढील वर्षी पुन्हा परीक्षा देऊन १२४ वा क्रमांक पटकावला. प्रांजली पाटील यांची प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून एर्नाकुलम येथे नेमणूक करण्यात आली होती आता त्यांना उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती मिळाली आहे.

अंध  असल्याने भारतीय रेल्वे लेखा सेवेने त्यांना नोकरी नाकारली होती. त्यांनी सूत्रे हाती घेताना सांगितले, की प्रयत्नांतून यश मिळवता येते. तिरुवनंतपुरमचे लोक व जिल्हाधिकारी कार्यालयातील लोक आपल्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. प्रांजली पाटील यांचे सोमवारी पुष्पगुच्छ व  लाडू देऊन स्वागत करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी अनुकुमारी या त्यांना पहिल्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेल्या, नंतर जिल्हाधिकारी गोपालकृष्णन तेथे आले. सामाजिक न्याय खात्याचे विशेष सचिव बिजू प्रभाकर यावेळी उपस्थित होते. प्रभाकर यांनी सांगितले,की तिरुवअनंतपुरम जिल्ह्य़ात प्रांजली या सूत्रे स्वीकारत आहेत हे शुभसंकेत आहेत. गोपालकृष्णन यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयाकडून सर्व सहकार्याची ग्वाही दिली.

खडतर प्रवास

प्रांजली पाटील या मूळ उल्हासनगरच्या असून शाळेत शिकत असताना सहाध्यायी विद्यार्थिनीने त्यांना पेन्सिल फेकून मारली, ती त्यांच्या डोळ्यावर लागली. त्यात त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही जाईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. ते दुर्दैवाने खरे ठरले, नंतर दादर येथील विशेष  शाळेत त्यांचे शिक्षण झाले. चांदीभाई कॉलेजमधून त्यांनी बारावीचे शिक्षण घेतले, नंतर त्या उल्हासनगर येथून सीएसटी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवास करीत होत्या, तेव्हा  लोक त्यांना मदत करीत असत