येथील एम्स रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  खुशबू चौधरी (वय १८) असे या मुलीचे नाव आहे.
खुशबू चौधरी ही मुळची राजस्थानमधील बिकानेर येथील रहिवाशी आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी ती एम्समध्ये १० जुलैला दाखल झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना या विद्यार्थिनीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. पोलिसांनी मतृदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यीनीची मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
रॅगिंगमुळे खुशबूने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.