कांगो आणि युगांडा या दोन आफ्रिकन देशांमध्ये माशांमुळे वादाला सुरूवात झाली. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की, दोन्ही देशाच्या सैनिकांनी एकमेंकावर गोळीबार गेला. यामध्ये दोन सैनिकांचा आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

युगांडा देशांमध्ये पावसाअभावी माशांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे एडवर्ड आणि अल्बर्ट या तलावातून बेकायदेशीर मासेमारी केली जातेय. या दोन्ही तलावाचा सर्वाधिक भाग कांगो देशाने व्यापला आहे. त्यामुळे या तळावर कांगो आपला आधीकार गाजवत आहे. विशाल अशा एडवर्ड आणि अल्बर्ट या तलावाच्या काटावर राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी हा आहे.

या दोन्ही तलावावर कांगोने आधीकार सांगितल्यामुळे युगांडातील मच्छिमारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एडवर्ड आणि अल्बर्ट या तलावात विविध प्रकारचे मासे आहेत. यामध्ये कॅटफिश, टिलापिया आणि नाइल पर्च आदी माशांचा समावेश आहे. येथील स्थानिक लोक या माशांची निर्यात करतात.

युगांडातील जवळपास सात लाखांपेक्षा आधीक जण मासेमारी व्यवसाय करतात. युगांडाच्या जीडीपीत मत्स्य उत्पादनाचा हिस्सा सुमारे ३ टक्के आहे. मात्र कांगोमधील मच्छिमार बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याने माशांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दोन्ही देशांदरम्यान पाणी वाटपाचा प्रश्न न सुटल्याने दोन्ही देशांनी या तलावांवर हक्क सांगत एकमेकांवर बंदुका रोखल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सैनिक आणि तीन नागरिकांचा समावेश आहे.