16 February 2019

News Flash

समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीला लागली आग, एकाचा मृत्यू

आग नियंत्रणात आणण्यासाठी नौदलाच्या फास्ट इंटरसेक्शन क्राफ्टने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली

समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीला आग लागून एकाचा मृत्यू झाला. कारवार मध्ये ही घटना घडली. जलपद्मा असे या बोटीचे नाव होते. ही आग लागताच भरसमुद्रात बोटीवर ज्वाळांचे लोट पसरले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी नौदलाच्या फास्ट इंटरसेक्शन क्राफ्टने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. इंजिन रूममधील स्वयंपाकाच्या केरोसिन स्टोव्हचा स्फोट झाल्याने बोटीला आग लागली होती. या दुर्घटनेत बोटीत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. जखमी रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

First Published on September 6, 2018 3:48 am

Web Title: fishing trawler was on fire 3 nautical miles outside karwar naval harbour on sept 5