ढाका : चीनने बांगलादेशला पाच लाख लशी बुधवारी दिल्या आहेत. बांगलादेशात लशींचा तुटवडा असल्याने या लशी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भारत इतर देशांना लशी पुरवेल अशी अपेक्षा असताना उलट चित्र दिसत असून नेपाळनेही आता चीनची लस घेतली आहे. श्रीलंकेतही चिनी लस पोहोचली आहे. बांगलादेशची लोकसंख्या १६ कोटी असून त्यांना भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका लस मिळेल अशी अपेक्षा होती, पण भारताने निर्यातबंदी लागू केल्याने आता भारताकडून लस मिळण्याची इतर देशांची आशा मावळली आहे.

चीनचे बांगलादेशातील राजदूत ली जिमिंग यांनी ‘सिनोफार्म’ या चिनी लशीचा साठा बुधवारी सुपूर्द केला. बांगलादेशने आधीच चिनी लशीला मान्यता दिली होती, त्याआधी जागतिक आरोग्य संघटनेने चिनी लशीच्या आपत्कालीन वापरावर शिक्कामोर्तब केले होते.