भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे करून हत्या करण्याची धमकी देणारे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांच्याविरोधात  विविध न्यायालयात पाच प्रलंबित खटले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मसूद यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, त्यांच्याविरोधात सहरानपूर येथील न्यायालयात चार खटले आणि लखनौ जिल्हा न्यायालयात एक खटला सुरू आहे. या खटल्यांमध्ये फसवणूक, धमकाविणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  मसूद यांनी एका प्रचारसभेदरम्यान मोदींवर टीका करत, त्यांचे तुकडे-तुकडे करून हत्या करण्याचे वक्तव्य केले होते. यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविली आहे.