News Flash

लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू

१८ जण गंभीर जखमी; बिहारहून दिल्लीकडे निघाली होती बस

उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे लखनऊ – आग्रा महामार्गावर आज (रविवार) सकाळी एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातात घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला. तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास ४० ते ५० जण या बसमध्ये प्रवास करत होते.

अपघातामधील जखमींनी कन्नौज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस बिहारहून कामगारांना घेऊन दिल्लीकडे जात होती. दरम्यान, कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगात असलेली ही हबस धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं महामार्गावरून खाली येऊन पडली.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांच्या आराडा-ओरडीचा व किंकाळ्यांचा आवाज ऐकताच, आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. नंतर काही वेळातच अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 11:23 am

Web Title: five people died at least 18 injured after a private bus hit another vehicle at agra lucknow expressway msr 87
Next Stories
1 देशात करोनाचा उद्रेक; २४ तासांत ३८ हजार ९०२ नवे रुग्ण, ५४३ मृत्यू
2 करोना बळींची संख्या सहा लाखांच्या पुढे
3 भारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनीची कोर्टात धाव
Just Now!
X