News Flash

VIDEO: शत्रूला धडकी भरवणाऱ्या ‘राफेल’चा अखेर IAF मध्ये समावेश

सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना...

युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक ‘राफेल’ फायटर विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला. अंबाला एअर बेसवर झालेल्या शानदार सोहळयात ‘राफेल’ फायटर विमाने भारतीय वायू दलाचा भाग झाली. ४.५ जनरेशनचे हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. शत्रूला धडकी भरवणारी शस्त्रास्त्रे ही राफेलची खासियत आहे.

राफेलच्या पहिल्या तुकडीत पाच विमाने असून Golden Arrow म्हणून ही स्क्वाड्रन ओळखली जाईल. २९ जुलैला राफेल फायटर विमानांचे भारतात आगमन झाले होते. पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती असताना राफेल विमानांचा आज औपचारिकरित्या इंडियन एअर फोर्समध्ये समावेश झाला.

अंबाला एअर बेसवर झालेल्या या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, IAF प्रमुख आर.के.भदौरिया, सीडीएस बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि फ्रान्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राफेलचा समावेश करताना पारंपरिक सर्वधर्म पूजा करण्यात आली तसेच तेजस विमानांसह ‘सारंगने हवाई चमूने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. २०१६ मध्ये भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा ६० हजार कोटींचा करार केला होता. त्यातली पहिली पाच विमाने भारताला मिळाली आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षात टप्याटप्याने उर्वरित राफेल विमाने भारताला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 11:21 am

Web Title: five rafale fighter jet formally inducted in indian air force dmp 82
Next Stories
1 VIDEO: राफेल’ गेमचेंजर ठरणार असं का म्हणतात? जाणून घ्या ‘त्या’ दोन मिसाइलबद्दल
2 देशात करोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ; गेल्या २४ तासांत ९५ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद
3 “कंगनाला वेळ का नाही दिला विचारणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी लॉकडाउनआधी मोदींनी भारतीयांना वेळ का नाही दिला हे विचारलं नाही”
Just Now!
X