X
X

खाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र

खशोगींचा खून कसा झाला, याबाबत सौदीने प्रथमच वक्तव्य केले आहे

रियाध : इस्तंबुलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात तुकडे-तुकडे करून मारून टाकण्यात आलेले पत्रकार जमाल खाशोगी यांच्या खुनाच्या गुन्ह्य़ासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्युदंडास पात्र आहेत, मात्र राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हे यात गुंतलेले नाहीत, असे सौदीच्या सरकारी वकिलांनी गुरुवारी सांगितले.

‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक आणि सौदीच्या राज्यकर्त्यांचे टीकाकार असलेले खाशोगी यांच्या हत्येबाबत आंतरराष्ट्रीय क्षोभ व्यक्त करण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. खाशोगी हे गेल्या २ ऑक्टोबरला सौदी दूतावासात शिरताना अखेरचे दिसले होते.

खाशोगी यांना अमली पदार्थ देऊन नंतर त्यांच्या हातपाय तोडण्यात आल्यानंतर ते मरण पावले, असे सौदीच्या सरकारी वकिलांच्या कार्यालयाने सांगितले. खशोगींचा खून कसा झाला, याबाबत सौदीने प्रथमच वक्तव्य केले आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे नंतर दूतावासाबाहेर एका एजंटला सोपवण्यात आले, असे या कार्यालयाचा प्रवक्ता म्हणाला. मात्र, राजपुत्र मोहम्मद यांना या खुनाबाबत काही माहिती असल्याचे त्याने नाकारले.

21
Just Now!
X