25 February 2021

News Flash

दोन कोटी बांधकाम कामगारांना पाच हजार कोटींची मदत

योजनेच्या अंमलबजावणीसाठी ८० अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती

(संग्रहित छायाचित्र)

 

करोना साथीच्या काळात सरकारने दोन कोटी बांधकाम कामगारांच्या खात्यात पाच हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असे कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले.

कामगार मंत्रालयाच्या वतीने आयोजित करोना योद्धा सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यांनी मुख्य कामगार आयुक्त, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ या संस्थातील काहींचा कर्मचाऱ्यांचे प्रश्न करोनाकाळातही सोडवल्याबाबत करोना योद्धा म्हणून सत्कार केला.  मुख्यालये व प्रादेशिक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली.

गंगवार यांनी सांगितले, की, दोन कोटी बांधकाम कामगारांच्या खात्यात पाच हजार कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ८० अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. इएसआयसी व इपीएफओ यांच्यासह प्रादेशिक कार्यालयांनी अहोरात्र काम करून कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवल्या.  गंगवार यांनी सांगितले,की २० नियंत्रण कक्षांकडे १६ हजार तक्रारी आल्या होत्या. त्यातील ९६ टक्के वेळेत सोडवण्यात आल्या. केंद्रीय कामगार आयुक्त कार्यालयाचा मोठा सहभाग होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयांनी कोविड १९ काळात ४७.५८लाख  दावे निकाली काढताना ११२२०.२६ कोटी रुपयांचे वाटप केले. कोविड काळात विनापरतावा अग्रीमाची सोय करण्यात आली होती. त्यात मूळ वेतन व महागाई भत्ता यासह तीन महिन्यांचे वेतन किंवा एकूण जमा रकमेच्या निम्मी रक्कम  काढण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्यात बदल करण्यात आला.  त्याची अधिसूचना २७ मार्चला जारी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:26 am

Web Title: five thousand crore assistance to two crore construction workers abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 विकास हाच भाजपच्या यशाचा आधार!
2 भारत-चीन यांच्यातील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे
3 मुख्यमंत्री नितीशकुमारच!
Just Now!
X