नवी दिल्ली : दिल्ली सामुदायिक बलात्कारप्रकरणी माहिती देण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना बोलावले होते. मात्र हे भाषण ध्वनिमुद्रित करण्यासाठी वेळेवर न गेलेल्या आपल्या पाच कर्मचाऱ्यांना दूरदर्शनने निलंबित केले आहे. कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये दोन कॅमेरामन आणि इंजिनीअरिंग विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्ली सामुदायिक बलात्काराच्या प्रकरणात माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी सोमवारी ९.३० ला प्रसारमाध्यमांना बोलावले होते. मात्र दूरदर्शनचे पथक ९.४० नंतर पोहोचले. त्यामुळे त्यांना पंतप्रधानांचे भाषण घेता आले नव्हते.