News Flash

न्यायालयात चिमुरडीने बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली अत्याचाराची करुण कहाणी

वकिलांच्या प्रश्नांना चिमुरडी घाबरली

संग्रहित छायाचित्र

दिल्ली हायकोर्टात पाच वर्षाच्या मुलीने बार्बी डॉलच्या माध्यमातून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची करुण कहाणी सांगितली. न्यायालयाने पीडित मुलीने दिलेला जबाब ग्राह्य धरत नराधमला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

जूलै २०१४ मध्ये दिल्लीत हनी या नराधमाने पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता. पीडित मुलगी तिच्या १० वर्षाच्या भावासोबत शाळेत जात असताना नराधमाने त्यांना गाठले. त्याने मुलीच्या भावाला १० रुपये देऊन दुकानातून चॉकलेट आणायला सांगितले. यानंतर तो चिमुरडीला घेऊन दिल्लीतील नरेला या भागात गेला. तिथे मुलीवर अत्याचार करुन तिला घराजवळ आणून सोडून दिले. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला पीडित मुलगी रस्त्यावर रडताना सापडली. तिच्या अंगावर स्कर्टही नव्हता. तिने मुलीला तातडीने घरी नेले. सुरुवातीला चिमुरडीने नेमके काय झाले हे सांगितले नव्हते. पण नंतर तिने आईला झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. अत्याचाराच्या प्रसंगानंतर चिमुरडी शांत झाली. तिला जबर मानसिक धक्का बसला होता. या घटनेचा परिणाम म्हणजे चिमुरडी वडिलांसोबत घरात एकटी राहायलादेखील घाबरु लागली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली होती.

सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान चिमुरडी वकिलांचे प्रश्न ऐकून घाबरायची. यावर न्यायाधीशांनी तोडगा काढला होता. तिच्या हातात बार्बी डॉल देण्यात आली होती. सुनावणीदरम्यान तिने बार्बी डॉलच्या माध्यमातून नेमके काय अत्याचार झाले होते हे सांगितले होते. नराधमाने कुठे स्पर्श केला असा प्रश्न विचारल्यावर तिने बार्बी डॉलच्या माध्यमातून उत्तर द्यायची. सत्र न्यायालयाने या आधारे नराधमाला दोषी ठरवत त्याला शिक्षाही सुनावली होती.

कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. पीडित मुलगी बचाव पक्षाच्या वकिलांच्या प्रश्नांना नीट उत्तर देऊ शकत नव्हती असे आरोपीचे म्हणणे होते. दिल्ली हायकोर्टात याप्रकरणाची सुनावणी झाली. हायकोर्टाने आरोपीचा दावा फेटाळून लावला. वकिलांच्या प्रश्नांनी मुलगी घाबरत होती. पण बार्बी डॉलच्या माध्यमातून काय अत्याचार झाले हे निदर्शनास आणून दिले होते असे हायकोर्टाने स्पष्ट केले. हायकोर्टाने नराधमाच्या तुरुंगावासाची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 9:45 pm

Web Title: five year old explains sexual assault on her through barbie doll court confirming jail term of accused
Next Stories
1 राजीव गांधी ट्रस्टला दिलेली जमीन हरियाणातील भाजप सरकार घेणार परत
2 ‘लष्कर’चा मोस्ट वाँटेड कमांडर जुनैदचा खात्मा
3 जम्मू- काश्मीरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, सहा जवान शहीद
Just Now!
X