12 November 2019

News Flash

पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर अमोल यादव यांना उड्डाण परवाना मंजूर

कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रायोगिक विमान तयार करणारे मुंबईकर वैमानिक अमोल यादव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर तातडीने चक्रे फिरून यादव यांना विमान उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून मंजुरी मिळाली आहे.

कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे. त्याला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांनी १८ वर्षे खर्च केली आहेत.

नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून (डीजीसीए) नियमानुसार ‘उड्डाणाचा परवाना’ (परमिट टू फ्लाय) मिळण्याच्या प्रक्रियेला मंजुरीसाठी २०११ सालापासून यादव यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवरून त्यांना तीन दिवसांपूर्वीच ही मंजुरी मिळाली.

अमोल यादव हे परवाना मिळण्यासाठी झगडत असल्याचे कळल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब पंतप्रधान मोदी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मोदी यांच्या मध्यस्थीमुळे या तरुण वैमानिकाच्या विनंतीवर तातडीने प्रक्रिया झाली आणि त्यांना डीजीसीएकडून ‘उड्डाणाचा परवाना’ मिळाला.

रविवारी पंतप्रधानांशी संवाद साधताना कॅप्टन यादव यांनी,  आपले स्वप्न साकारण्यासाठी मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

First Published on October 21, 2019 12:52 am

Web Title: flight license granted to amol yadav after pms intervention abn 97