उत्तर भारतातील विमानतळांवर हवाई वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या विमानांनी सीमावर्ती भागात सकाळच्या सुमारास घुसखोरी केली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, जम्मू, लेह, शिमला, कांगरा, कुल्लू या भागात हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती.

दुपारी तीनच्या सुमारास या क्षेत्रातील विमानतळावरील वाहतूक सुरु झाली असे डीजीसीएकडून सांगण्यात आले. लेहमध्ये वातावरण खराब असल्यामुळे तिथे उद्याच हवाई वाहतूक सुरु होईल. NOTAM जारी झाल्यानंतर बुधवारी सकाळी जम्मू आणि श्रीनगरसाठी उड्डाण केलेली विमाने मूळ विमानतळावर परतली.

डीजीसीएने NOTAM जारी केला होता. सुरक्षा आणि अन्य परिस्थिती लक्षात घेऊन NOTAM जारी केला जातो. NOTAM जारी झाल्यानंतर हवाई वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येते.