28 March 2020

News Flash

Flipkart च्या संदीप पाटील यांची Truecaller च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

पाटील यांनी मुंबईच्या आयआयटी पवई येथून बी. टेकची पदवी आणि लंडन बिजनेस स्कुलमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे

कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख सांगणारं स्वदेशी अॅप ‘ट्रु-कॉलर’ने ई-कॉमर्समधील अग्रगण्य कंपनी ‘फ्लिपकार्ट’चे माजी अधिकारी संदीप पाटील यांची भारतीय व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी(एमडी) नियुक्ती केली आहे. पाटील हे ट्रु-कॉलरच्या ग्लोबल मॅनेजमेंट टीमचा भाग असतील, ही टीम भारतात दररोज 10 दशलक्ष वापरकर्ते व्यवस्थापित करते. कंपनीकडून बुधवारी(दि.२९) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

संदीप पाटील हे कंपनीच्या बंगळुरू कार्यालयातून काम करतील, ट्रु-कॉलरच्या व्यवसाय धोरणाचा जगभरात विस्तार करणे आणि महसूल वाढवणे, हे त्यांचं मुख्य लक्ष्य असणार आहे. तसंच, ते दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधील स्थित ट्रु-कॉलरच्या टीमचे देखील निरीक्षण करतील अशी माहिती कंपनीने दिली. पाटील यांच्या अनुभवाचा फ्लिपकार्टला खूप फायदा होईल आणि यामुळे भविष्यातील योजना लवकर पूर्ण होतील असं ट्रु-कॉलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक म्हणाले.

पाटील यांनी यापूर्वी, फ्लिपकार्टमध्ये अनेक महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये ‘फिनटेक’च्या सुरूवातीपासून त्याच्या विस्तारापर्यंतचाही समावेश आहे. फ्लिपकार्टमध्ये काम करण्याशिवाय त्यांनी लंडनमधील मॅककिन्से अ‍ॅण्ड कंपनी येथेही काम केले आहे. पाटील यांनी मुंबईच्या आयआयटी पवई येथून बी. टेकची पदवी आणि लंडन बिजनेस स्कुलमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2019 3:42 pm

Web Title: flipkarts sandeep patil joins truecaller as india md
Next Stories
1 ममतांनी लोकशाहीमध्ये हिंसाचार घडवला, शपथविधीला येऊच नये – तिवारी
2 ‘गंगा मैली हो गई’ : पाणी थेट पिण्यास अयोग्यच
3 काँग्रेस-एनसीपीसाठी धोक्याची घंटा! १६ जागी युतीचे उमेदवार २ लाखाच्या फरकाने विजयी
Just Now!
X