News Flash

‘..तर २६/११ पुन्हा घडेल’

नजीकच्या काही देशांच्या नियंत्रण नसलेल्या शस्त्रसज्ज जहाजांचा भारताच्या सुरक्षेस धोका असून यामुळे २६/११ सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ शकते.

| December 3, 2013 05:37 am

नजीकच्या काही देशांच्या नियंत्रण नसलेल्या शस्त्रसज्ज जहाजांचा भारताच्या सुरक्षेस धोका असून यामुळे २६/११ सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ शकते. असा इशारा भारताचे नौदलप्रमुख डी.के.जोशी यांनी आज (मंगळवार) दिला आहे. त्याचबरोबर अशा जहाजांवर थेट आंतराष्ट्रीय नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
जोशी म्हणाले, “नियंत्रण नसलेली शस्त्रसज्ज जहाजे ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीसारखे धोके निर्माण होऊ शकतात. अशा जहाजांवर जर शस्त्रसाठा असेल, तर हा शस्त्रसाठा कोठे उतरविला जाईल याची माहिती नसल्याने कोणत्याही देशासमोर अशा प्रकारचे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे देशात २६/११ सारख्या घटनेची पुनरावृत्ती केव्हाही होऊ शकते. यासाठी अशा जहाजांवर आंतराष्ट्रीय नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 5:37 am

Web Title: floating armouries can lead to 2611 type attacks navy chief
Next Stories
1 ए. के. गांगुली यांचा ‘डब्ल्यूबीएचआरसी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार नाही
2 नासा चंद्रावर फुलवणार भाजीपाल्याचा मळा!
3 अॅसिड विक्रीबाबत धोरण निश्चित करावे; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यसरकारांना निर्देश
Just Now!
X