22 September 2020

News Flash

केरळात पावसाचे २२ बळी

तटरक्षक दलाची १६ पथके सज्ज असून कोझीकोडमधील बायापोर येथून ५५० जणांना हलवण्यात आले.

| August 10, 2019 03:25 am

तिरुअनंतपुरम : केरळला पावसाने शुक्रवारी झोडपून काढले असून पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांची संख्या २२ झाली आहे. आतापर्यंत २२ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. एक वर्षांपूर्वीच केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्या वेळी शतकातील सर्वात मोठा पूर आला होता. आताही पुन्हा पावसाचा जोर चालू असून सरकारने लष्कर, नौदल  व हवाई दल यांची मदत मागितली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वायनाड, मल्लापुरम, कन्नूर, इडुक्की  येथे सर्वात मोठा फटका बसला असून कोची विमानतळावरील सेवा विस्कळीत झाली आहे. रविवापर्यंत विमानसेवा रद्द करण्यात आली असून गेल्या ऑगस्टमध्ये विमानसेवा पंधरा दिवस पुरामुळेच बंद ठेवावी लागली होती. १४ पैकी ९ जिल्ह्य़ांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून शैक्षणिक संस्था, व्यावसायिक महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी शुक्रवारी सकाळी उच्चस्तरीय बैठक घेतली असून त्यात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला एकूण २२ लोक या पूरस्थितीत बळी पडले आहेत. २४ ठिकाणी दरडी कोसळणे व भूस्खलन असे प्रकार झाले आहेत. वायनाडमधील मेपड्डी येथे मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले असून दोन टेकडय़ांमधील भाग वाहून गेला आहे. भारतीय हवाई दलाची मदत मेपड्डी व निलाम्बूर येथे मागवण्यात आली आहे. मेपाडी येथील भूस्खलनाने पुथमला येथील घरे गाडली गेली असून १५० लोक अडकले आहेत.

नऊ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. एनडीआरएफची १३ पथके पाठवण्यात आली असून १८० लष्करी अधिकारी तेथे मदतकार्य करीत आहेत. तटरक्षक दलाची १६ पथके सज्ज असून कोझीकोडमधील बायापोर येथून ५५० जणांना हलवण्यात आले.

कोची येथे नौदलाच्या दक्षिण विभागाने सांगितले, की विमानतळ खुला करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मल्लापुरम येथे एकाच कुटुंबातील चार जण घर पडून मारले गेले. कोचीन विमानतळ पुराच्या पाण्यामुळे रविवारी दुपापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 3:25 am

Web Title: floods kill at least 22 in kerala zws 70
Next Stories
1 शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीस प्रारंभ
2 उन्नाव बलात्कारप्रकरणी सेनगरविरुद्ध आरोप निश्चित
3 मतपत्रिकांच्या वापराची मागणी फेटाळली
Just Now!
X