26 January 2020

News Flash

शेजारी राहणाऱ्या महिलेला फ्लाईंग किस देणे पडले महाग, तीन वर्ष कारावास

शेजारी राहणाऱ्या महिलेकडे पाहून अश्लील इशारे करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली आहे.

शेजारी राहणाऱ्या महिलेकडे पाहून अश्लील इशारे करणाऱ्या आरोपीला मोहाली सत्र न्यायालयाने तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली आहे. आरोपीचे नाव विनोद आहे. विनोद आपल्याकडे पाहून अश्लील इशारे करतो तसेच आतापर्यंत त्याने अनेकवेळा मला पाहून फ्लाईंग किस दिली आहे असा आरोप महिलेने तिच्या तक्रारीत केला होता.

तक्रारदार महिला विवाहित असून ती मोहालीत फेझ ११ मध्ये राहते. आरोपी आणि तक्रारदार महिला एकाच हाऊसिंग सोसायटीत राहतात. विनोद आपल्याला पाहून अश्लील टिपणी आणि इशारे करायचा असा आरोप महिलेने केला होता. विनोदकडून छळ सुरु असल्याचं तिने पतीच्या कनावर घातल्यानंतर या जोडप्याने मोहालीच्या फेझ ११ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली.

आरोपीने सुद्धा या जोडप्याच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यात त्याने महिलेने आणि तिच्या पतीने मारहाण केल्याचे त्याने म्हटले होते. विनोदने महिला व तिच्या पतीवर जो आरोप केला होता त्यात पोलिसांना तथ्य आढळले नाही. न्यायालयाने विनोदला तीन वर्ष तुरुंगवास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

First Published on August 14, 2019 1:16 pm

Web Title: flying kisses to neighbour mohali man 3 years in jail dmp 82
Next Stories
1 बाथरुममध्ये शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीची पत्नीला मारहाण
2 काश्मीरमध्ये विनाअट येण्यास तयार, कधी येऊ सांगा -राहुल गांधी
3 सीमावाद सोडवण्याची चीनची इच्छा, विशेष प्रतिनिधी म्हणून NSA अजित डोवाल करणार चर्चा
Just Now!
X