News Flash

… तर सविता हालप्पनवार यांचा जीव वाचला असता!

मुळच्या कर्नाटकातील असलेल्या ३१ वर्षीय हालप्पनवार यांचा गेल्यावर्षी २८ ऑक्टोबर रोजी आर्यलंडमध्ये मृत्यू झाला होता.

| April 3, 2013 11:06 am

आर्यलंडमध्ये गेल्यावर्षी मृत्युमुखी पडलेल्या डॉ. सविता हालप्पनवार यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी त्यांच्या पोटातील गर्भावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱया आरोग्य विभागातील अधिकाऱयाने दिला आहे.
मुळच्या कर्नाटकातील असलेल्या ३१ वर्षीय हालप्पनवार यांचा गेल्यावर्षी २८ ऑक्टोबर रोजी आर्यलंडमध्ये मृत्यू झाला. आर्यलंडमधील कायद्यानुसार हालप्पनवार यांचा गर्भपात करण्यास तेथील डॉक्टरांनी नकार दिला. त्यांच्या पोटात त्यावेळी १७ आठवड्यांचे गर्भ होते. गर्भाच्या ह्रदयाचे ठोके ऐकू येत असल्यामुळे आम्ही गर्भपात करणार नाही, असे डॉक्टरांनी हालप्पनवार यांच्या नातेवाईकांना सांगितले. आर्यलंड हा कॅथलिक देश असल्यामुळे तिथे गर्भपात करण्यास बंदी आहे.
गॅलवे युनिव्हर्सिटी रुग्णालयात हालप्पनवार यांचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाच्या अधिकाऱयाने केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी हालप्पनवार यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिले नाही, असे ठपका ठेवला आहे. हालप्पनवार स्वतः तीव्र आजारी होत्या. त्यावर डॉक्टरांनी परिपूर्ण उपचार केले नाहीत. त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद न देता आणखी खालावली. तरीही डॉक्टरांनी त्यांच्यावर पुरेसे उपचार केले नाहीत, असा ठपका ठेवण्यात आलाय.
रक्तातील विषबाधेने आजारी पडलेल्या हालप्पनवार यांच्या शरीरातील जंतूसंसर्ग वाढत होता. त्यामुळे निर्माण होणाऱया धोक्यांकडे डॉक्टरांनी पुरेशा गांभीर्याने लक्ष दिलेच नाही. त्यांनी केवळ हालप्पनवार यांच्या पोटातील गर्भाचे ह्रदयाचे ठोके थांबत नाही, तोपर्यंत गर्भपात करता येणार नाही, याकडे जास्त लक्ष दिल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
हालप्पनवार यांच्या मृत्यूनंतर भारतात या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला होता. आर्यलंडने आपल्या गर्भपात बंदीच्या कायद्याचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यावेळी सर्वच स्तरांतून करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 11:06 am

Web Title: foetus not mother was main focus says savita halappanavars death report
Next Stories
1 बलात्कारविरोधी विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
2 देहाचा पाचोळा केलेल्या नराधमांनी उगाळला ‘कफना’चा वाद..
3 भारतीय स्त्रीशक्तीचे सुखचित्र!
Just Now!
X