News Flash

कन्हैया कुमारवर हैदराबादमध्ये चप्पल फेकली

पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्याला अटक केली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यावर गुरुवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात चप्पल भिरकावण्यात आली. ‘भारत माता की जय’ म्हणत एका व्यक्तीने कन्हैया कुमारकडे चप्पल फेकली. पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्याला अटक केली आहे.
कन्हैया कुमारचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात अनेक लोक उपस्थित होते. त्याचे भाषण सुरू असतानाच त्याच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रकार घडला. उपस्थितांनी लगेचच चप्पल फेकणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसांकडे दिले.
कन्हैया कुमारने बुधवारी दुपारी हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईला भेटून न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली. चालू महिन्यात तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने रोहित वेमुला त्याचे आदर्श असल्याचे म्हटले होते. कन्हैया कुमार याने बुधवारी सायंकाळी रोहित वेमुलाचे मित्र आणि समर्थकांना भेटण्याची योजना आखली आहे. त्यांच्या मागण्या कुलगुरू अप्पाराव पोडिले यांनी फेटाळून लावल्या आहेत. रोहित वेमुला समर्थक विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या कार्यालयाला घेराव केला. त्यांना सहा तास बाहेर निघू दिले नाही. विद्यार्थ्यांनी कार्यालयाची मोडतोड व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेकही केली. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2016 4:35 pm

Web Title: footwear thrown on kanhaiya kumar at hyderabad
टॅग : Kanhaiya Kumar
Next Stories
1 ब्रसेल्समधील बेपत्ता राघवेंद्र गणेश यांच्या मोबाईल सिग्नलचा मेट्रोपर्यंत माग
2 बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ने केला होता, हेडलीची कबुली
3 कन्हैयाकुमारची रोहितच्या आईला भेटून न्याय मिळवून देण्याची शपथ
Just Now!
X