News Flash

प्रेम टिकवण्यासाठी प्रेयसीच प्रियकराला पाठवत होती नर्सेसच्या आंघोळीचे व्हिडिओ

...आणि समोर आलं धक्कादायक प्रकरण

रुग्णालयाच्या महिला वसतिगृहातील बाथरुममध्ये नर्सच्या आंघोळीचे व्हिडिओ बनवण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वसतिगृहातीलच एका नर्सच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. ही महिला नर्सच अन्य महिला सहकाऱ्यांच्या आंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन प्रियकराला पाठवत होती.

ती असे का करत होती?
तामिळनाडूतील वेल्लोरमधून पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. व्हाईटफिल्डमधील एका नामवंत रुग्णालयात व्हिडिओ रेकॉर्डिंगचे हे प्रकरण घडले आहे. प्रियकराला व्हिडीओ पाठवणारी नर्स या रुग्णालयाच्या आपातकालीन विभागात काम करत होती. काहीही करुन तिला तिचे प्रेमसंबंध टिकवायचे होते. यासाठी ती प्रियकराच्या सगळया मागण्या पूर्ण करत होती. पाच डिसेंबरला वसतिगृहातील एका कर्मचाऱ्याला बाथरुममधील खिडकीजवळ रेकॉर्डिंगसाठी ठेवलेला मोबाइल फोन सापडला आणि हा सर्व प्रकार उघड झाला. बँगलोर मिररने हे वृत्त दिले आहे.

जबानीत काय सांगितले?

अहवालात नाव आल्यानंतर त्या नर्सने गोळयांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बरी झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने दोन वेळा लग्न केलं पण दोन्ही लग्न टिकू शकली नाहीत, असे सांगितले. काहीही करुन तिला आता सुरु असलेले प्रेम प्रकरण टिकवायचे होते.

एकदा तिने असाच केलेला कॉल राँग नंबर लागला. पण समोरच्या व्यक्तीबरोबर तिची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. तिचा प्रियकर शेफ होता. दोघे काहीवेळ भेटले. जेव्हा प्रियकराला तिच्या फसलेल्या लग्नांबद्दल समजले, तेव्हा तो तिच्यापासून लांब राहू लागला. हे नाते टिकवण्यासाठी ती नर्स आरोपीच्या सर्व मागण्या पूर्ण करु लागली.

सुरुवातीला ती त्याला स्वत:चे व्हिडिओ पाठवायची. पण त्याला त्याचा नंतर कंटाळा येऊ लागला. त्याने तिला दुसऱ्या महिलांचे आंघोळीचे व्हिडिओ पाठवायला सांगितले. त्यानंतर ती अन्य महिला सहकाऱ्यांच्या आंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याला पाठवू लागली.

वेल्लोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे व्हिडिओ मागवण्यामागचा हेतू काय होता?, त्याने व्हिडिओची ऑनलाइन विक्री केली? त्याची पोलीस आता चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:39 pm

Web Title: for boyfriend nurse recording colleagues bathing video dmp 82
Next Stories
1 युरोपीयन देशांचे न्यू इयर लॉकडाउनमध्येच; जास्तीत जास्त दोन पाहुणे, १९ जानेवारीपर्यंत निर्बंधात सूट नाही अन् बरंच काही
2 अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित
3 …तर २०२१ च्या सुरुवातीलाच करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होईल; WHO चा इशारा
Just Now!
X