07 March 2021

News Flash

Covid-19: भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

(फोटो सौजन्य - 'वुडलँड्स हेल्थ कँम्पस' फेसबुक अकाउंट)

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका 59 वर्षीय परिचारिकेला (नर्स) राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. करोना महामारीमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल परिचारिकांसाठी असलेल्या राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

सिंगापूरमध्ये करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पाच परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आला असून यात कला नारायणसामी यांचाही समावेश आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली. सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांचं हस्ताक्षर असलेल्या प्रमाणपत्रासह एक ट्रॉफी आणि 10,000 एसजीडी (सिंगापूरचं चलन) देण्यात आले.

कला नारायणसामी, ‘वुडलँड्स हेल्थ कँम्पस’मध्ये नर्सिंगच्या उपसंचालक आहेत. त्यांना संक्रमण नियंत्रण प्रक्रियांचा वापर करण्यासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. कला नारायणसामी यांनी वर्ष 2003 मध्ये सार्सच्या (SARS)संसर्गादरम्यान संक्रमण नियंत्रण प्रक्रियांबाबत शिक्षण घेतलं होतं.

“नर्सिंग तुम्हाला भविष्यात निराश करणार नाही, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नेहमी मिळेल, असं मी आमच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्वांना नेहमी सांगेन. मी पुढील पिढीच्या नर्सना मार्गदर्शन करेन, अशी प्रतिक्रिया कला नारायणसामी यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 10:37 am

Web Title: for covid services indian origin singapore nurse gets presidents award sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 येत्या शनिवारी चीनचं ‘मिशन मंगळ’, ऑर्बिटर, लँडर रोव्हर पाठवणार
2 करोनानं मोडले सर्व विक्रम, २४ तासांत ४५,७२० नवे रुग्ण; १,१२९ जणांचा मृत्यू
3 भाजपात प्रवेशानंतर २४ तासात माजी फूटबॉलपटूची राजकारणाला ‘किक’
Just Now!
X