04 July 2020

News Flash

अनैतिक संबंधांच्या आड येतो म्हणून मुलाची हत्या, आईनेच दिली सुपारी

अनैतिक संबंधांच्या आड येतो म्हणून एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या २२ वर्षाच्या मुलाची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

अनैतिक संबंधांच्या आड येतो म्हणून एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या २२ वर्षाच्या मुलाची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली असून तपास करणाऱ्या पोलिसांनाही यामुळे धक्का बसला आहे. शुक्रवारी पोलिसांनी अशुलच्या हत्ये प्रकरणी त्याची आई सुरेश देवी, प्रियकर कन्हय्या जावई अमित कुमार आणि दोन भाडोत्री मारेकऱ्याना अटक केली.

सुरेश देवीचे स्वंयघोषित बाबा कन्हय्या बरोबर अनैतिक संबंध होते. अशुलला हे संबंध मान्य नव्हते त्यावरुन आई आणि मुलामध्ये सतत वाद व्हायचे. त्यामुळे सुरेश देवीने सुपारी देऊन आपल्याच पोटच्या मुलाला संपवले. मागच्या महिन्यात १८ जूनला अशुलचा दादरी कोट कॅनल येथे मृतदेह सापडला होता. कुटुंबिय अशुलच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी जास्त रस दाखवत नसल्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांचा कुटुंबावरील संशय बळावला.

सुरेश देवीकडे पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर तिने गुन्हयाची कबुली दिली. अशुलला संपवण्यासाठी दोन भाडोत्री मारेकऱ्यांना ३५ हजार रुपये दिल्याचे तिने सांगितले. सुरेश देवीची चार वर्षांपूर्वी स्वंयघोषित बाबा कन्हय्या बरोबर ओळख झाली होती. विधी करण्याच्या बहाण्याने कन्हय्या सुरेश देवीच्या घरी यायचा व रात्रभर तिथेच रहायचा.

एकदिवस अशुलने सुरेश देवी आणि कन्हय्याला प्रणयक्रीडा करताना रंगेहाथ पकडले होते. तेव्हापासून अशुलचे कन्हय्यावरुन आईबरोबर सतत भांडण व्हायचे. अखेर सुरेश देवीने कन्हय्याबरोबर सल्ला मसलत करुन अशुलला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने जावई अमित कुमारची सुद्धा मदत घेतली.

अमित वॉशिंग मशिन खरेदी करण्याच्या बहाण्याने अशुलला आपल्या सोबत बाईकवरुन घेऊन गेला. निर्जन स्थळी बाईक थांबवल्यानंतर अन्य दोन मारेकरी तिथे पोहोचले. त्यांनी अशुलशी मैत्री केली. त्यांनी सॉफ्ट ड्रींकमध्ये गुंगीचे औषध मिसळून ते ड्रींक अशुलला पाजले. अशुल बेशुद्ध झाल्यानंतर त्यांनी गळा आवळून त्याची हत्या केली व तिथून पसार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 7:51 pm

Web Title: for illicit relation women killed own son
Next Stories
1 धक्कादायक! श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात
2 गौतमी नदीत होडी उलटून दोघांचा मृत्यू, पाच बेपत्ता
3 काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी का? – नरेंद्र मोदी
Just Now!
X