देशात एक लाखाच्या उंबरठय़ावर पोहोचलेली रोजची करोना रुग्णवाढ मंदावल्याचे आशादायी चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ७०,५८९ रुग्ण आढळले असून, मृतांची संख्या सुमारे महिन्याभरानंतर हजाराखाली म्हणजे ७७६ इतकी नोंदविण्यात आली.

देशातील एकूण रुग्णसंख्या ६१,४५,२९१ झाली आहे. त्यातील ५१,०१,३९७ रुग्ण करोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ८३.०१ टक्के आहे. देशभरात ९,४७,५६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात जवळपास महिनाभर करोना रुग्णांच्या मृत्यूंची रोजची संख्या एक हजारापेक्षा अधिक होती. गेल्या २४ तासांत मृतांची संख्या ७७६ इतकी नोंदवण्यात आली आहे.  देशातील करोनाबळींची एकूण संख्या ९६,३१८ वर म्हणजे एक लाखाच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. मात्र, करोनाबळींचे हे प्रमाण १.५७ टक्के असून, ते एका टक्क्याखाली आणण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.