News Flash

काँग्रेसला मत दिलं म्हणून स्थानिक भाजपा नेत्याचा चुलत भावावर गोळीबार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले म्हणून स्थानिक भाजपा नेत्याने चुलत भावावर गोळीबार केला.

प्रतिकात्मक छायाचित्र

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले म्हणून स्थानिक भाजपा नेत्याने चुलत भावावर गोळीबार केला. हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यात ही घटना घडली. धर्मेंदर सीलानी असे आरोपीचे नाव आहे. धर्मेंदर सीलानीने राजा सिंह या आपल्या चुलत भावावर एकूण तीन गोळया झाडल्या. त्यातील दोन गोळया पायावर तर एक गोळी पोटात लागली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

राजा सिंहला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. धर्मेंदर सीलानी फरार असून पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. धर्मेंदरने गोळया झाडण्यासाठी जी बंदूक वापरली त्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता.

धर्मेंदर सीलानी बहाद्दूरगड पालिकेचा माजी सदस्य असून तो भाजपाचा स्थानिक पदाधिकारी आहे. त्याचा मोठा भाऊ हरेंदर सिंह काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी असून माजी नगरसेवक आहे. धर्मेंदरने राजा आणि त्याच्या कुटुंबाला भाजपाला मतदान करायला सांगितले होते. रविवारी रात्री मतदानानंतर धर्मेंदर आणि राजामध्ये वादावादी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 3:07 pm

Web Title: for voting congress bjp leader shoots at cousin
Next Stories
1 VIDEO : ढगांमध्ये ‘रडार’ काम करत नाही का? जाणून घ्या मोदींच्या विधानातील तथ्य
2 कोलकात्यात डाव्या पक्षांचा मोर्चा
3 सीआरपीएफच्या जवानांमुळे जिवंत बाहेर पडू शकलो: अमित शाह
Just Now!
X