News Flash

फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान; रिलायन्स 71 व्या क्रमांकावर

पहिल्या 200 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यांदीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सच्या नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.

फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत रियालंस इंडस्ट्रीज या एकमेव कंपनीला या यादीत स्थान देण्यात आले आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.

पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या यादीत टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एल अँड टी, भारतीय स्टेट बँक आणि एनटीपीसीला पहिल्या 500 कंपन्यांच्या यादीत स्थान दिले आहे. तर 2000 कंपन्यांच्या यादीत टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, पावर ग्रिड, हिंदाल्को, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब नेशनल बँक, ग्रासिम, बँक ऑफ बडोदा, पावर फायनॅन्स आणि कॅनरा बँकेचा समावेश आहे.

या यादीत 61 देशांच्या कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये अमेरिकेतील सर्वाधित म्हणजेच 575 कंपन्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ चीनच्या 309 आणि जपानच्या 223 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या 10 कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायना, जेपी मॉर्गन, चायना कंस्ट्रक्शन बँक, अॅग्रिकल्चर बँक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका, अॅपल, पिंग एन इंश्योरंस ग्रुप, बँक ऑफ चाइना, रॉयल डच शेल आणि वेल्स फार्गो यांना स्थान देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 3:05 pm

Web Title: forbes list 57 indian companies in top 2000 list reliance industries mukesh ambani on 71st place jud 87
Next Stories
1 आंदोलन चिघळलं, बंगालमधील १५१ डॉक्टरांचा राजीनामा
2 SCO Summit: नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही, टाळला संवाद
3 शेतकऱ्यांनंतर बिग बींनी पुलवामा शहीदांच्या नातेवाईकांना दिला मदतीचा हात
Just Now!
X