पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या नियमाचे वारंवार उल्लंघन होत असले तरी, भारतीय लष्कर अशा हल्ल्यांना चोखरित्या प्रत्युत्तर देत असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. पाकिस्तानच्या हल्ल्यांना तोंड देण्यास भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान समर्थ असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. ‘आयएनएस कामोर्टा’ युद्धनौकेच्या राष्ट्रार्पण सोहळयात शनिवारी ते बोलत होते. पाकिस्तानकडून शनिवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील आर. एस पूरा आणि अरनिया भागात बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात मेवरील गावातील दोन नागरिकांचा मृत्यूमुखी पडले होते. तर, पाच नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचा एक जवानही जखमी झाला होता.