पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान, त्यांचे व्यवस्थापक व भारतीय सहकारी यांना सक्तवसुली संचालनालयाने २.६१ कोटी रुपये किमतीच्या परकीय चलनाचा घोटाळा केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा अंतर्गत त्यांची २०११ पासून चौकशी सुरू होती. खान यांनी दिवंगत चित्रेश श्रीवास्तव यांना जागतिक कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून नेमले होते व ते भारतातील विविध कार्यक्रमांतून पैसे गोळा करत असत. त्यातील काही रक्कम ही रोख घेतली जात होती. ती बेकायदेशीररीत्या डॉलरमध्ये रूपांतरित करून खान यांना दिली जात होती, असा आरोप आहे.