26 November 2020

News Flash

परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मुभा

व्हिसा निर्बंध शिथिल; मात्र पर्यटकांसाठी दारे बंदच

(संग्रहित छायाचित्र)

पर्यटकवगळता सर्व परदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा निर्बंध गुरुवारी शिथिल केले. करोनामुळे फक्त परदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांना देशात येण्याची मुभा होती.

आता व्यापारीभेट, परिषदा, नोकरी, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय उपचार आदी कारणांसाठी व्हिसा दिले जातील.

विमान वा जलवाहतुकीच्या मार्गाने विदेशी नागरिक, परदेशस्थ भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारतात येता येईल. भारताचा अन्य देशांशी झालेला विमान करार (एअर बबल), वंदे भारत मोहीम, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर बिगरव्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या विमानफेऱ्या याद्वारे परदेशातून प्रवाशांना भारतात येणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या करोनासंदर्भातील सूचनांचे पालन करणे सक्तीचे असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

केंद्र सरकारने जूनमध्ये अल्पवयीन परदेशी मुला-मुलींना भारतात येण्याची मुभा दिली होती मात्र, परदेशस्थ भारतीय नागरिक वा भारतीय नागरिक असलेल्या किमान एका पालकाचे मुलांबरोबर असणे सक्तीचे होते.

बदल काय?

करोनामुळे मार्च महिन्यात केंद्र सरकारने सर्व व्हिसा रद्द केले होते, त्यांना आता अनुमती देण्यात आली आहे. व्हिसांची मुदत संपली असेल तर नव्या व्हिसावर भारतात येण्याची परवानगी मिळेल. पर्यटन तसेच, वैद्यकीय कारणांसाठी व्हिसा मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. ई-व्हिसा दिले जाणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:18 am

Web Title: foreign nationals are allowed to enter india abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 संसदीय समितीचे फेसबुक, ट्विटरला हजर राहण्याचे आदेश
2 आता मोफत लशीचे वचन
3 रोजगारनिर्मितीच्या आश्वासनांची स्पर्धा
Just Now!
X