प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तान लष्कराने १५ जुलै रोजी पाडलेले ड्रोन भारतीय लष्करामार्फत चालविण्यात येत असल्याचे न्यायवैद्यक चाचणीतून स्पष्ट झाले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
सदर ड्रोन भारतीय ठाण्यावरून उडविण्यात आले होते, असे ड्रोनमधून मिळालेल्या काही दृश्यांवरून सूचित होत असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रथम हे ड्रोन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ होते आणि पाकिस्तानच्या दिशेकडे त्याची पाहणी सुरू होती आणि त्यानंतर त्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली, असे प्रवक्त्याने म्हटले आहे.पाकिस्तानच्या लष्कराने काही प्रतिमा आणि व्हिडीओ फिती प्रसारित केल्या असून त्यामध्ये ड्रोन भारतीय ठाण्यांवरून उडाल्याचे आणि त्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचे दिसत आहे, असे लष्कराने म्हटले आहे.