News Flash

आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या

राज्यातील विरोधीपक्ष तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) ते वरिष्ठ नेते होते.

हैदराबाद : आंध्र प्रदेश राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी आपल्या हैदराबाद येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे, ते ७२ वर्षांचे होते. राज्यातील विरोधीपक्ष तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) ते वरिष्ठ नेते होते. या घटनेनंतर त्यांना तत्काळ बसावटकम रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोडेला यांच्या निधनावर मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

२०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन नव्या तेलंगाणा राज्याची निर्मिती झाली, त्यावेळी कोडेला हे आंध्र प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष बनले होते. ते नारसोराओपेट मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. एकदा ते सत्तेनापल्ली येथूनही आमदार झाले होते. त्यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा आणि पंचायत राज मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता.

१९८३ मध्ये ते टीडीपीमध्ये सहभागी झाले. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता, गुंटूर येथील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेत ते डॉक्टर बनले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 3:48 pm

Web Title: former andhra pradesh speaker kodela siva prasada rao commits suicide at his residence in hyderabad aau 85
Next Stories
1 लग्न झालेल्या महिला लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा आनंदी – आरएसएस
2 ‘गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण’, शोभा डे यांनी उडवली निर्मला सीतारामन यांची खिल्ली
3 राम मंदिराबाबत केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलावं-उद्धव ठाकरे
Just Now!
X