20 October 2019

News Flash

माजी बँकर आणि आपच्या नेत्या मीरा सन्याल यांचे निधन

रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमधील भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरुन राजीनामा देत त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.

मीरा सन्याल यांचे निधन

बँकिंग क्षेत्रातील आपली उत्कृष्ट वाटचाल सोडून राजकारणात प्रवेश केलेल्या मीरा सन्याल यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले, त्या ५७ वर्षांच्या होत्या. aत्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.


त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे सन्याल यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. देशाने एका तल्लख मेंदू आणि सभ्य आत्म्याच्या व्यक्तीला गमावले आहे, असे भावनिक ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

राजकारणात प्रवेश करताना सन्याल यांनी आपले ३० वर्षांचे उज्ज्वल बँकिंग करिअर सोडण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. कोची येथे जन्मलेल्या सन्याल यांनी एबीएन अॅम्रो या परदेशी बँकेच्या आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट फायनान्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

मीरा सन्याल यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघातून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

First Published on January 12, 2019 12:08 am

Web Title: former banker aam aadmi party member meera sanyal passes away