25 November 2020

News Flash

गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये पक्षप्रवेश, विधानसभा निवडणूक लढवणार

नितीश कुमार यांच्या घरी केला प्रवेश

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जदयूमध्ये प्रवेश केला. (फोटो-एएनआय)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारच्या राजकारणात आज अधिकृतरित्या प्रवेश केला. पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये आज प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या घरी जाऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून पांडे चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी बोललं जात होतं.

आयपीएस अधिकारी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांचं नाव सुशांत प्रकरणामुळे चर्चेत आलं होतं. त्यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांचा राजीनामाही मंजुर करण्यात आला. कार्यकाळ संपण्यासासठी अवघे पाच महिने शिल्लक असतानाच त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. त्यांच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती. पांडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

काही माध्यमांनी पांडे हे शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये (संयुक्त जनता दल) प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, गुप्तेश्वर पांडे हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन परतले होते. त्यानंतर आज ते प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी पाच वाजता पाटणातील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी जाऊन जदयूमध्ये प्रवेश केला.

गुप्तेश्वर पांडे यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेविषयीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर पांडे यांनी भूमिका मांडतांना “मी या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आणि डीजीपी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिल्यानं त्यांचे आभार व्यक्त करण्यास आलो आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असं पांडे म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 4:46 pm

Web Title: former bihar dgp gupteshwar pandey joins jdu chief minister nitish kumars bmh 90
Next Stories
1 बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या ३०० कंपन्या राहणार तैनात
2 …तर तेजस्वी यादव पहिल्याच कॅबिनेट बैठकीत घेणार ‘हा’ मोठा निर्णय
3 गुप्तेश्वर पांडे यांचं आज बिहारच्या राजकारणात पदार्पण, ‘या’ पक्षाचा झेंडा घेणार हाती
Just Now!
X