News Flash

‘बसपा’च्या माजी नेत्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

दुचाकीवरून आले होते चार हल्लेखोर

प्रतिकात्मक छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आज (शनिवार) दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कानपूरमधील चकेरी येथे हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यता आलं, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संबंधित परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शींकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर हे दुपारी जाजमऊ येथील केडीए आशियाना कॉलनीजवळ आपल्या इनोव्हा कारमधून उतरून फोनवर बोलत होते. त्याचेवळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामुळे रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पिंटू सेंगर घटनास्थळीच कोसळले. तर, हल्लेखोरांना रस्ता मोकळा असल्याचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना व काही काडतूसं आढळून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसएशीप दिनेस कुमार प्रभू, एसपी पूर्वी यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

मूळचे गोगूमऊ येथील निवासी असलेले नरेंद्र सिंह उर्फ पिंटू ठाकूर चकेरी येथील मंगला बिहारमध्ये राहत होते. विद्यार्थी दशेतील राजकारणानंतर ते सक्रीय राजकारणात सहभागी झाले होते. बसपाच्या तिकीटावर त्यांनी छावणी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या आई शांतीदेवी गजनेरच्या कठेठी येथू जिल्हा पंचायत सदस्या आहेत तर वडील सोने सिंह हे गोगूमऊचे प्रमुख आहेत. पिंटू ठाकूर हे तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना चंद्रावर जमिनीचा तुकडा देण्याचे म्हटले होते. यानंतर ते बसपाच्या राजकारणात सक्रीय झाले होते. २००७ मध्ये पिंटू यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. बसपा जिल्हाध्यक्ष राम शंकरक कुरील यांनी सांगितले आहे की, नरेंद्र सिंह उर्फ पिंटू ठाकूर सध्या पार्टीचे सदस्य नव्हते. त्यांना पक्षातून काढले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 5:22 pm

Web Title: former bsp leader shot dead msr 87
Next Stories
1 करुन दाखवलं! कडाक्याच्या थंडीत ७२ तासात लष्कराच्या इंजिनिअर्सनी गलवान नदीवर उभा केला पूल
2 पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला; पंतप्रधान कार्यालयाकडून खुलासा
3 …किमान बुद्धिचं प्रदर्शन तरी करु नका.. जे. पी. नड्डांचा राहुल गांधींना टोला
Just Now!
X