07 March 2021

News Flash

’48 तासांत मायावतींची माफी मागा अन्यथा…’

बसपा प्रमुख मायावतींबद्धल वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी मायावतींची येत्या 48 तासांमध्ये माफी मागावी अन्यथा...

बसपा प्रमुख मायावतींबद्धल वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी मायावतींची येत्या 48 तासांमध्ये माफी मागावी अन्यथा  साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्यास 50 लाख रुपयांचं बक्षीस मी जाहीर करेन असा इशारा बसपाचे माजी आमदार विजय यादव यांनी दिला आहे.

‘साधना सिंह यांनी मायावतींची 48 तासांमध्ये माफी मागावी, जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडून आणि पाठिराख्यांकडून पैसे गोळा करु आणि जो कोणी सिंह यांचा शिरच्छेद करेल त्याला 50 लाख रुपये देऊ’ असं यादव म्हणाले.

बेताल वक्तव्यावरुन आमदार सिंह यांना बसपाने नोटीस बजावली आहे. याबरोबरच महिला आयोगानेही या वक्तव्याची दखल घेऊन साधना सिंह यांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले आहेत.

चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी मायावतींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यांनी अतिशय वाईट शब्दांत मायावतींची तृतीयपंथियांशी तुलना केली होती आणि ‘उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री स्त्री आणि पुरुष दोन्हीही नाहीत. जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. त्यांचं सर्व लुटलं गेलंय, तरीही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासलं’, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 10:20 am

Web Title: former bsp mla on bjp leader sadhana singhs remark says will pay 50 lakh for her head if she doesnt apologise to mayawati
Next Stories
1 दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय; गुप्तचर यंत्रणाकडून अॅलर्ट जारी
2 लोकसभा निवडणूक लढवणार का? करिना कपूर म्हणते…
3 अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा कट?
Just Now!
X