सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी राजीनामा दिला आहे. आलोक वर्मा यांना निवड समितीने गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले. त्यानंतर त्यांची वर्णी डी.जी. फायर सर्व्हिसेस अँड होम गार्ड या पदावर करण्यात आली. मात्र आलोक वर्मांनी हे पद स्वीकारण्यास नकार देत थेट राजीनामाच देऊन टाकला. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जस्टिस ए. के. सिकरी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीत खर्गे यांनी संचालकपदी आलोक वर्मा राहावेत या बाजूने मतदान केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिकरी या दोघांनी त्यांना हटवण्याच्या बाजूने मतदान केले. ज्यामुळे २-१ अशा मताने हा निर्णय घेण्यात आला.

निवड समितीने दिलेल्या या निर्णयानंतर आलोक वर्मा यांची बदली डीजी फायर सर्व्हिसेस अँड होमगार्ड या पदावर करण्यात आली. मात्र हे पद न स्वीकरता त्आलोक वर्मा यांनी राजीनामा देणेच पसंत केले.