News Flash

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका

अजित जोगी हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अजित जोगी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. काही काळापूर्वी झालेल्या अपघातात अजित जोगी यांचा एक पाय अधू झाला. तेव्हापासून अजित जोगी हे व्हिल चेअरवर होते. त्यांना आज हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

आज सकाळी ब्रेक फास्ट करत असताना अजित जोगी यांच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांच्या पत्नीने आणि घरातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. अखंड मध्यप्रदेशात आणि नंतर छत्तीसगढमध्ये यांच्या राजकारणाचं अनेक वर्षे वर्चस्व होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:59 pm

Web Title: former chhattisgarh cm ajit jogi has suffered a cardiac arrest at home and has been put on ventilator at the hospital scj 81
Next Stories
1 ‘करोना हेल्पलाइन’पेक्षा मद्यासाठी गुगलवर झुंबड
2 इव्हांका ट्रम्प यांच्या पर्सनल असिस्टंटला करोना व्हायरसची लागण
3 लॉकडाउनदरम्यान तीन राज्यांनी केला श्रम कायद्यात बदल; कोणाला फायदा, कोणाला नुकसान?
Just Now!
X