24 October 2020

News Flash

अयोध्येच्या निकालावर माजी सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका; म्हणाले,…

याचिकेवर निकाल देणं आव्हानात्मक होतं

देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता. त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या या वादावर पडदा पडला. निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. या खटल्याचा निकाल देणारे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.

देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता. त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या या वादावर पडदा पडला. निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. या खटल्याचा निकाल देणारे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.

माला दीक्षित लिखित ‘अयोध्या से अदालत तक भगवान श्रीराम’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन समारंभाला व्हिडीओच्या माध्यमातून अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मनोगत व्यक्त केलं. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले,”४० दिवस ज्येष्ठ आणि वरिष्ठ वकिलांच्या पीठानं या खटल्या मोठं सहकार्य केलं आणि हा खटला अभूतपूर्व असाच होता. सर्वकष मुद्यांवर ठोस पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर हा निकाल देण्यात आला. अंतिम निकाला देण्याचं काम अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होतं. या खटल्यात प्रत्येक मुद्यांवर टोकाचा युक्तीवाद झाला आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी पूर्ण ताकदीनं व इच्छाशक्तीनं आपले मुद्दे मांडले होते,” असं रंजन गोगोई म्हणाले.

“देशाच्या न्यायालयीन इतिहासात पूर्ण ताकदीनं लढल्या गेलेल्या खटल्यापैकी हा एक महत्त्वाचा खटला होता. या खटल्याचं नेहमीच एक वेगळं स्थान राहणार आहे. मौखिक व वेगवेगळ्या भाषांमध्ये या असलेल्या दस्ताऐवज व साक्षीदारांच्या आधारावर या बहुआयामी खटल्यावर अंतिम निकाल देण्यात आला,” असं रंजन गोगोई म्हणाले.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावर निकाल दिला होता. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 5:46 pm

Web Title: former chief justice of india ranjan gogoi talk on ayodhya case bmh 90
Next Stories
1 करोनाच्या संकटामुळं जनगणना आणि एनपीआरचा पहिला टप्पा स्थगित
2 आभाळ कोसळत नाहीये; अध्यक्ष निवडीची घाई करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याचा टोला
3 लखनौतील हत्याकांडांचं गुढ उलगडलं; मुलीनेच घातल्या आई व भावाला गोळ्या
Just Now!
X