News Flash

काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

कॉंग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली (photo pti)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर ते बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांचा देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

फेब्रुवारी महिन्यात, माजी मुख्यमंत्री कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी, अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्या प्रकृतीबाबत फोन करून चौकशी केली होती.

हेही वाचा- करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं कितपत प्रभावित होणार?; AIIMS च्या प्रमुखांची महत्त्वाची माहिती

करोना काळात कमलनाथ सक्रिय आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रात अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळलेले कमलनाथ २०१८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर एका वर्षातच कॉंग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 1:26 pm

Web Title: former cm kamal nath admitted to hospital srk 94
Next Stories
1 लडाख सीमेवर चीनचा युद्धसराव; भारतची प्रत्येक हालचालींवर बारीक नजर
2 Farmers Protest: सहा महिन्यांत ५०० मृत्यू; ट्विट करत राहुल गांधींचा पाठिंबा
3 योगी सरकारच्या निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी
Just Now!
X