द्रमुकच्या माजी नगरसेवकाने ब्युटी पार्लरमध्ये घुसून एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी सेल्वाकुमार अत्यंत भयानक पद्धतीने महिलेला मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तामिळनाडूच्या पेरामबालूरमधल्या ब्युटी पार्लरमध्ये ही घटना घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. २५ मे २०१८ रोजी ही घटना घडली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सेल्वाकुमारला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. सेल्वाकुमार महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य तीन महिला त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होत्या.

पण सेल्वाकुमार कोणाचेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो अमानुषपण या महिलेवर लाथांचे प्रहार करत होता. त्याने या महिलेला का मारहाण केली ? त्या महिलेचा सेल्वाकुमारशी काय संबंध आहे? यासंबंधी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी सेल्वाकुमारची चौकशी सुरु केली आहे.