News Flash

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनचा राजस्थानमध्ये अपघात

अपघातातून थोडक्यात बचावले अझरुद्दीन

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला राजस्थानातील सवाई माधेपूर येथे अपघात झाला आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते. अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. अझरुद्दीन यांना दुसऱ्या कारने हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझरुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे ते ठीक असल्याचे समजताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि प्रथमोपचारानंतर त्याला सोडण्यात आले.

अझरुद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये ते या पदावर निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी टोंक-सवाई माधोपूर या मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. पण भाजपाचे सुखबीरसिंग यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघाचे खासदारही होते.

अझरुद्दीन यांनी ४७ कसोटी आणि १७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. तीन विश्वचषकातही ते भारताचे प्रमुख होते. पण नंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 5:26 pm

Web Title: former cricketer mohammad azharuddins car met with an accident in soorwal rajasthan scj 81
Next Stories
1 शिवसेना उत्तर प्रदेश पंचायत निवडणुका लढवणार; काँग्रेसकडे मागणार मदतीचा ‘हात’
2 न्यूड फोटोच्या सहाय्याने १०० महिलांची फसवणूक करणारा गजाआड
3 हे काय? मोफत उपचार मिळणार म्हणून भाजपा खासदाराने राजीनामा घेतला मागे
Just Now!
X