दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. शीला दीक्षित या दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. गांधी कुटुंबाचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता.

– शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ रोजी पंजाबच्या कापूरथाळामध्ये खत्री कुटुंबात झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतच झाले.

PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

– १९९८ ते २०१३ अशी तब्बल १५ वर्ष त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले. दिल्लीचे सर्वाधिककाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पराभव केला होता.

– ११ मार्च २०१४ रोजी शीला दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर त्याचवर्षी २५ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला.

– २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. पण नंतर त्यांनी माघार घेतली.

– यावर्षी १० जानेवारी २०१९ रोजी त्यांची दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

– १९८४ ते १९८९ दरम्यान शीला दीक्षित यांनी उत्तर प्रदेशच्या कनौज लोकसभा मतदारसंघाचे संसदेमध्ये प्रतिनिधीत्व केले.

– १९८६ ते १९८९ दरम्यान शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषवले. आधी त्या संसदीय राज्यमंत्री होत्या नंतर पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होत्या.

– महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जेव्हा त्यांनी आंदोलन सुरु केले तेव्हा १९९० साली उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यासह ८२ जणांना २३ दिवस तुरुंगात ठेवले होते.

– १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून भाजपाच्या लाल बिहारी तिवारी यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला. त्यानंतर १९९८ साली शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. २०१३ पर्यंत तब्बल १५ वर्ष त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.