दिल्लीचे माजी महिला व बालकल्याण मंत्री संदीप कुमार यांना दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने सोमवारी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संदीप कुमार यांची आक्षेपार्ह सीडी समोर आल्यानंतर ते अडचणीत सापडले होते. आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांची आधी मंत्रिमंडळातून आणि नंतर पक्षातून हकालपट्टी केली होती.
एका महिलेसोबत संदीप कुमार आक्षेपार्ह कृत्य करताना या व्हिडीओत दिसले होते. पक्षातून पायउतार झाल्यानंतर संबंधित व्हिडिओतील महिला समोर आली आणि संदीपकुमार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेने शनिवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. संदीप कुमार यांनी रेशनकार्ड देण्याचे आमिष दाखवून माझे लैंगिक शोषण केले, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला. दिल्लीतील सुलतानपुरी पोलिस ठाण्यात संबंधित महिलेने संदीप कुमार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी रात्री उशिराने दिल्ली पोलिसांनी संदीप कुमार यांना अटक केली होती. रविवारी त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी दुपारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Former Delhi minister Sandeep Kumar sent to three day police remand by Tis Hazari Court pic.twitter.com/6zBNBq9lWQ
— ANI (@ANI_news) September 5, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 5:10 pm