दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या शरणागतीची घोषणा म्हणजे स्वातंत्र्याचाच दिवस होता असे वेगळे मत व्यक्त करणारे माजी अध्यक्ष रिचर्ड फॉन वेझ्ॉकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
   दहा वर्षांच्या काळात त्यांनी जर्मनीचे एकीकरण घडवून आणण्यात मोठा वाटा उचलला होता. विद्यमान अध्यक्ष जोआशिम गॉक यांनी वेझ्ॉकर यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले.
   १९८४ ते १९९४ या काळात ते जर्मनीचे अध्यक्ष होते. मे १९८५ मध्ये त्यांनी नाझी जर्मनीच्या पराभवाच्या चाळिसाव्या स्मृतिदिनानिमित्त केलेले भाषण त्यांची लोकप्रियता वाढवणारे ठरले होते. पूर्वीच्या काळात ते अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या लष्करात सैनिक होते.